आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Keep Muslims Outis This Dighi Hsg Societys Policy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: मुस्लिम डॉक्टरला फ्लॅट विकल्याने मालकाला मारहाण व धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी गावात एका मुस्लिम डॉक्टरला फ्लॅट न विकण्यासाठी मालकावर दबाव टाकण्याचा व त्याला मारपीट करण्याची घटना उघडकीस आली आहे. दिघी परिसरातील साई कमल विहार सोसायटीतील ही घटना आहे. फ्लॅटचा मालक हिंदू आहे तर मुस्लिम डॉक्टरला फ्लॅट विकायचा होता. दरम्यान, या घटनेनंतर फ्लॅट मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे वाद-
दिघी परिसरात साई कमल विहार नावाच्या एका हाऊसिंग सोसायटीत सुमारे 80 परिवार राहतात. याच सोसायटीत रविंद्र पाटील यांचा एक फ्लॅट आहे. पाटील यांनी हा फ्लॅट दोन वर्षापासून मुस्लिम भाडेकरूला दिला आहे. पाटील जवळच आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. पाटील यांनी नुकताच हा फ्लॅट उस्मानाबाद येथील रहिवासी असलेल्या एका मुस्लिम डॉक्टरला विकला. रियाज सौदागर असे या डॉक्टरचे नाव असून, त्याची पत्नी शिक्षक आहे.
पाटील यांनी आरोप केला आहे की, रियाज यांना फ्लॅट विकल्यानंतर हाऊसिंग सोसायटीकडून धमकी मिळाली व फ्लॅट मुस्लिमांना न विकण्याचा इशारा दिला. झालेला सौदा रद्द करण्यासाठीही पाटीलवर दबाव टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर सोसायटीच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर 13 मे ला पाटील यांनी सोसायटीतील अध्यक्ष आणि सदस्यांना कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
धमकी दिलेली टेपही आहे उपलब्ध-
पाटील यांनी त्यांना मिळालेल्या धमक्याचे ऑडियो टेप बनविले आहेत. या टेपमध्ये त्यांना सरळ धमकी दिल्याचे व फ्लॅट विकल्यास परिणाम भोगायला मिळतील असे सांगितल्याचे समोर आले आहे. पाटील यांनी सांगितले की, रियाज व त्याचे कुटुंबिय मागील दोन वर्षापासून या फ्लॅटमध्ये राहत आहेत. मात्र, जसा हा फ्लॅट मुस्लिम डॉक्टर रियाजला विकला गेला तेव्हापासून सोसायटीतील लोक एकदम नाराज झाले.
सोसायटीने आरोप फेटाळले-
सोसायटीचे अध्यक्षाने पाटील यांचे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे की, मी याबाबत काहीही विरोध केला नाही. मी माझ्याबद्दल सांगू शकतो, इतर लोकांचे मला माहित नाही. सोसायटीतील इतर सदस्यांची जबाबदारी मी स्वीकारू शकत नाही. या टेपमध्ये सोसायटीतील एक सदस्य पाटील यांना धमकी देताना दिसत आहे. हा सदस्य म्हणत आहे की, आम्ही प्राण देऊ पण आपला फ्लॅट मुसलमानांना देणार नाही. आपल्याला माहित असेलच की, मागील काही दिवसापूर्वी मुस्लिम एमबीए पदवीधर तरूणाला एका डायमंड कंपनीने नोकरी देण्यास नकार दिला होता. यानंतर मुंबईत एका मुस्लिम तरूणीला धर्माच्या आधारावर फ्लॅटमधून काढून टाकण्याची घटना उघडकीस आली होती.
रियाजचे काय म्हणणे आहे?-
रियाज यांनी सोसायटीतील सदस्य चुकीचे वागत असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, जेव्हा मी व माझे नातेवाईक येथे भाडेकरू म्हणून राहत होतो तेव्हा कोणालाही काही त्रास वाटत नव्हता. मात्र मी हा फ्लॅट खरेदी करताच सोसायटीने महिन्याचा मेन्टेंनन्स खर्च घेणे ही बंद केले. रियाज यांनी आता हा फ्लॅट विकण्यासाठी जाहीरात दिली आहे. रियाज यांनी म्हटले आहे की, मी आता येथे राहू इच्छित नाही. कारण मला अशा लोकांसोबत राहणे पसंत नाही व कोर्ट कचेरीत जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा येथून बाहेर गेलेलेच बरे अशी नाराजीची भावना रियाज यांनी व्यक्त केली.