आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविनाश भाेसलेंसाठी खडसेंनी हजार काेटी बुडविल्याचा अाराेप - अापच्या प्रवक्त्या मेनन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भाेसले यांना अार्थिक फायदा मिळवून देण्यासाठी माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाचा एक हजार काेटी रुपयांचा महसुल बुडविला,’ असा अाराेप अाम अादमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. शासकीय अधिकाऱ्यांसाठी अारक्षित असलेल्या जागेत हा गैरप्रकार झाला असून याप्रकरणाची चाैकशी करुन खडसेंवर कारवार्इ करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मेनन म्हणाल्या, ‘शिवाजीनगर भांबुर्डा येथील सर्व्हे नं.१३२ ची जागा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी अारक्षित हाेती. त्यातील दीडएकर जागा घेऊन भाेसले यांनी तेथे कार्यालय उभारले अाहे. ही जागा घेण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे अावश्यक हाेते. तसेच नियमानुसार माेबदला (नजराणा) जमा करणे अावश्यक हाेते. हा प्रकार अॅड. राजेश बजाज यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये उघडकीस अाणत तक्रार केली. त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सात जुलै २०१५ राेजी जागेचा माेबदला व दंड भरण्याबाबतचे भाेसलेंना अादेश दिले. त्यावर भाेसले यांनी तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसेंकडे अपील केले. त्यावर खडसेंनी जिल्हाधिकाऱ्यांचे अादेश रद्द केले. त्यामुळे भाेसले यांना सुमारे ५० काेटी रुपये दंड भरावा लागला नाही. याच निर्णयाचा अाधारे अाता इतर सर्व जागेत काेणीही नजराणा भरणार नाहीत. यापाेटी शासनाचा एक हजार काेटी रुपयापेक्षा जास्त महसुल बुडणार अाहे. खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अादेश रद्द का ठरवले? याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची मागणी करणार असल्याचे मेनन म्हणाल्या.

झाेटिंग समितीला हवीय मुदतवाढ
मुंबई | मंत्रिपदाचा दुरुपयोग करून पुण्यातील भोसरी येथील एमअायडीसीची तीन एकर जमीन पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी केल्याचा एकनाथ खडसेंवर अाराेप अाहे. या अाराेपाच्या चाैकशीसाठी राज्य सरकारने २३ जून रोजी निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग यांची समिती नेमली हाेती. या समितीला तीन महिन्यांची मुदत दिली हाेती, मात्र या मुदतीत चाैकशी पूर्ण न झाल्याने समितीतर्फे सरकारकडे मुदतवाढीची मागणी करण्यात अाली अाहे.

‘अाप’वर दावा ठाेकू : भाेसले
अविनाश भाेसले इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित भाेसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे अाराेप फेटाळले. ‘हे अाराेप बिनबुडाचे अाहेत. या प्रकरणाचा पाेलिसांकडून पूर्ण तपास झाला असून त्याचा अहवाल न्यायालयाकडे दिला अाहे. अाता अाम्ही निकालाची वाट पाहत अाहे. अाराेप करणाऱ्यांविराेधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु.’
बातम्या आणखी आहेत...