आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेवर छप्पर फाडून पडले शंभर-दिडशे किलोंचे दगड; 4 प्रवासी जखमी, 3 जण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - खंडाळा घाटात हुबळी-लोकमान्य टिळक एक्सप्रेसवर मंकीहिलजवळ दरड कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामध्ये 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या हुबळी एक्सप्रेस या गाडीवर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोहमार्गावरील मंकीहिल या ठिकाणी डोंगरावरून दगड पडला. घटनेत चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी एक किरकोळ तर तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे गाडी एक तास उशिराने धावली.
बातम्या आणखी आहेत...