आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khawada\'s Actor Prashnat Inagale Attempt To Suicide

\'ख्वाडा\'त \'पांडा\'ची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपचारानंतर घरी गेलेला प्रशांत इंगळे सध्या अंथरूणावरच पडून आहे. - Divya Marathi
उपचारानंतर घरी गेलेला प्रशांत इंगळे सध्या अंथरूणावरच पडून आहे.
पुणे- राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित 'ख्वाडा' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत इंगळे याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. नुकतेच त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले.
प्रशांतने "ख्वाडा' चित्रपटात पांडाची भूमिका केली होती. त्यासाठी त्याचे कौतुक झाले, सत्कार झाले. पण प्रत्यक्षात प्रशांतकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही. आईवडिलांचे छत्र बालपणीच हरपले आहे. प्रशांतचा सांभाळ त्याचा भाऊ अनिलने केला. या भावंडांकडे 20 गुंठे शेती आहे. पण पावसाने ओढ दिल्याने हे कुटुंब अडचणीत आले आहे. त्यातच प्रशांतने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले आणि त्याचे व्याज भरण्यात तो अपयशी ठरला. त्याचा ताण येऊन प्रशांतने 24 डिसेंबर रोजी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. 2 जानवारी रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
पुढे आणखी वाचा, प्रशांत इगळेंबाबत...