आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: खेड-शिवापूर टोलनाक्याची पारवडी ग्रामस्थांकडून तोडफोड, तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भोर तालुक्यातील हद्दीत असलेला खेड- शिवापुर टोल नाक्याची आज पारवडी गावातील 40 ते 50 ग्रामस्थांनी तोडफोड केली. टोल नाक्यावरील कर्मचा-यांनी पारवडी गावातील लोकांशी हुज्जत घातली होती. यावेळी टोल कर्मचारी व ग्रामस्थांत वाद झाला. या वादाचे रूपांतर सहा टोल बुथ फोडण्यामध्ये झाले. पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी टोलनाक्यावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना हूसकावून लावले असून, टोल वसुली पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या गोंधळामुळे अर्धा तासापेक्षा जास्त टोलनाका बंद करण्यात आला होता.