आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kholapur Loksabha Seats, Pawar\'s Direction Towords To Munna Mahadik

धनंजय महाडिकांना पवारांनी दिले लोकसभेच्या तयारीचे आदेश, कोल्हापूर राष्ट्रवादीकडेच?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मानहानिकारक पराभवाची चव चाखावी लागलेल्या राष्ट्रवादीने तेथे भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला असून, युवा नेतृत्त्व धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांना तयारीचे आदेश दिले असल्याचे समजते. गेल्या वेळी महाडिक यांना डावलून संभाजीराजेंना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अपक्ष उभे राहिलेल्या व राष्ट्रवादीचेच माजी नेते असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी राजेंचा दारूण पराभव केला होता.
मुन्ना महाडिक यांना तयारीचे आदेश दिले असल्याने कोल्हापूरचीच जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती मिळते. मंडलिक अपक्ष म्हणून खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी सोनियांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामुळे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे कोल्हापूरची जागा नियमानुसार आमच्याकडे येते असा दावा केला होता. त्या दाव्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. मात्र उत्तरेकडील चार राज्यांत यूपीएचा दारूण पराभव झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी शाब्दिक टोलेबाजी थांबवत आत्मचिंतन करण्याकडे लक्ष दिल्याचे मागील काही दिवसातील चित्र आहे.
पुढे वाचा, मुन्ना महाडिक यांच्याबाबत शरद पवार व सुशीलकुमार शिंदेंनी काय म्हटले...