आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidnapping And Extortion Out Of Business Rivalry

व्यवसायातील वादातून अपहरण; तीन आरोपी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्याजवळील उंड्री येथील एका द्राक्ष निर्यातदार व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे 20 लाखांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आशिष माणिक दांगट (वय 28), मधुकर आनंद थोरात (40) व दीपक पोपट लोंढे (29) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली.

याबाबत प्रशांत ज्ञानदेवराव भोसले यांनी वारजे पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. भोसले यांचा द्राक्ष निर्यातीचा मोठा व्यवसाय असून त्यांची दांगटशी पूर्वीची ओळख होती. या व्यवसायात भोसले यांच्या सांगण्यावरुन आशिष दांगट याने एक कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणुक केली. मात्र तोटा झाल्याने भोसले यांनी दांगट याला केवळ मुळ रक्कमच परत केली. नफा न मिळाल्याचा दांगटला राग होता. काही दिवसांपूर्वी भोसले हे कात्रज-देहूराड बायपास येथून कारने जात असताना दांगट व त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना मधुकर थोरात याच्या कार्यालयात नेवून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने 20 लाख रुपयाचा चेक लिहुन घेतला. तसेच 26 जुलैपर्यंत रोख रक्कम आणून न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवून सोडून दिले होते.