आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृश्यम चित्रपट पाहून चुलत भावाचा खून; दोघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - व्याजाने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या चुलत भावाचा अभिनेता अजय देवगणचा “दृश्यम’ चित्रपट पाहून त्या पद्धतीने खून केल्याची घटना रांजणगाव पाेलिसांच्या तपासात उघड झाली अाहे. मिलिंद मारोजी अालसपुरे (वय-३९,रा.तरोडा खुर्द, नांदेड) असे मृताचे नाव अाहे. याप्रकरणी कपिल गाेपाळ अालसपुरे व दीपक बाेरा यांना अटक केली अाहे.

नांदेडहून ४ डिसेंबर राेजी पुण्यात येताना मिलिंद हा शिरूर तालुक्यातील काेंढणपुरी येथून बेपत्ता झाल्याची तक्रार पाेलिसांकडे अाली हाेती. गणेश माहाेरकर यांनी मिलिंद बेपत्ता झाल्याची तक्रार दिली हाेती. त्यानंतर रांजणगाव पाेलिस सदर तरुणाचा तपास करताना मिलिंदच्या मोबाइल काॅल डिटेल्सवरून त्याचे कपिलशी अनेकदा फाेनवर संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. मिलिंदने दाेन वर्षांपूर्वी कपिलला भिशी व शेअर मार्केटसाठी दहा लाख रुपये दिल्याची माहिती समाेर अाली. ते पैसे कपिल देत नसल्याने मिलिंद नांदेडहून पुण्याला आला हाेता.
४ डिसेंबर राेजी मिलिंद कपिलच्या दुकानावर गेला. त्यानंतर कपिलने त्यास ५० हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम धनादेशने देताे, असे सांगितले. पैसे घेतल्यानंतर दाेघे फुरसुंगीला निघाले. कपिलने माेटारसायकल फुरसुंगी पुलापासून कॅनाॅलच्या कच्च्या रस्त्याने निर्जनस्थळी नेत मिलिंदच्या डाेक्यात दगड घालून त्याचा खून केला.

असा रचला कट
कपिलने कट रचून मिलिंदच्या नावाने पुण्याहून नांदेडसाठी तिकीट बुक केले. मात्र, मिलिंदएेवजी राम नावाच्या व्यक्तीस तिथे बसवून काेंढापुरी येथे उतरण्यास सांगितले अाणि मिलिंदची बॅग व माेबाइल बसमध्ये ठेवले. त्यानंतर तो हरवल्याची तक्रार देत बनाव रचला. नंतर कपिलने दीपक याच्या मदतीने ४ डिसेंबर राेजी रात्री मिलिंदचा मृतदेह फुरसुंगी कॅनॉलमध्ये फेकून दिला. दरम्यान, दृश्यम चित्रपट पाहून आपण हा कट रचल्याचे आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...