आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Knife Attack On Nitin Bhujbal Who Is A Pune City Yuva Sena President

युवा सेनेच्या पुणे शहरप्रमुखावर अज्ञाताचा तलवारीने हल्ला, जहांगीरमध्ये उपचार सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहर युवा सेनेचा अध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर वडगाव शेरीमध्ये तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
भुजबळ यांना पुण्यातील जहांगीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज दुपारी भुजबळ आपल्या घरातून चारचाकीने ऑफिसमध्ये चालले होते. त्याचवेळी दोन दुचाकीस्वारांनी भुजबळ यांची गाडी अडवून त्यांना थांबवले. त्याचवेळी गाडीच्या खाली येण्यास सांगितले. मात्र भुजबळ यांनी त्यास विरोध केला. गाडीत आहे त्याच स्थितीत हल्लेखोरांनी भुजबळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ यांच्या डोक्यावर व हातावर वार करून हल्ला करून हल्लेखोर फरार झाले आहेत. भुजबळ जर कारमधून बाहेर आले असते तर कदाचित त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असता.
दरम्यान, हा हल्ला कोणी केला याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनी जहांगीरमध्ये जाऊन भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर बोलताना आढळराव-पाटील म्हणाले, हा राजकीय वैमनास्यातून हल्ला करण्यात आला आहे. वडगाव शेरीमध्ये शिवसेनेचे सुनील टिंगरे यांचा पराभव करून भाजपचे जगदीश मुळीक निवडून आले आहेत. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. भुजबळ हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.
मागील महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या एका पदाधिका-याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.