आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: असा झाला तृप्ती देसाई यांचा जीवनप्रवास, शनीशिंगणापूर, महालक्ष्मी ते हाजी अली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शनीशिंगणावर चौथरा असो, त्र्यंबकेश्वर शिवमंदीर प्रवेश असो, कोल्हापुरच्या महालक्ष्मीची पूजा असो किंवा मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेश असो तृप्ती देसाई यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. देसाई यांनी महिलांच्या असंतोषाला आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. तृप्ती देसाई यांचा आज 32 वा वाढदिवस आहे. या निमित्त आम्ही घेऊन आलोय तृप्ती देसाई यांच्याबद्दल सबकूछ....
- 12 डिसेंबर 1984 रोजी तृप्ती देसाई यांचा जन्म झाला.
- मुंबईच्या विद्या विकास विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
- मुंबईच्या एसएनडीटी विद्यापिठात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.
- इंडिया अग्नेन्स करप्शनसाठी त्यांनी काम केले. अजित बॅंक संघर्ष समितीच्या, समाज सुरक्षा कृती समितीच्या, भूमाता ब्रिगेड या समाजसेवी संस्थेच्याही त्या अध्यक्षा आहेत.
- सध्या त्या पुण्याला राहतात. त्यांच्या पतीचे नाव प्रशांत देसाई आहे. 29 सप्टेंबर 2006 रोजी त्यांचे लग्न झाले.
- तृप्‍ती देसाई यांचा विविध सामाजिक आंदोलनामध्‍ये सहभाग राहिला आहे.
- बुडित अजित सहकारी बँक ठेवीदारांच्‍या आंदोलनामुळे त्‍या चर्चेत आल्‍या होत्‍या.
- 2012 मध्‍ये तृप्‍ती देसाई यांनी कॉंग्रेसच्‍या तिकिटावर पुणे महापालिका निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.
- शनी शिंगणापूरच्‍या महिला मंदीर प्रवेश आंदोलनामुळे त्‍या पुन्‍हा प्रकाश झोतात आल्‍या.
दिल दिया है जान भी देंगे.... आहे कॉलर ट्यून....
- तृप्ती देसाई यांची कॉलर ट्यून आहे, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये...
- सुभाष घई यांच्या कर्मा या चित्रपटातील गाण्याची कॉलर ट्यून आहे.
- तृप्ती देसाई मुळच्या कोल्हापूरच्या आहेत.
- एसएनडीटीतील होम सायन्स या अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला होता. पण काही घरगुती समस्यांमुळे त्यांना डॉप आऊट व्हावे लागले. पण दूरस्त शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी एका मुक्त विद्यापिठातून कला शाखेत पदवी घेतली आहे.
- 2010 मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली. आता या संस्थेचे महाराष्ट्रात तब्बल 4000 सदस्य आहेत.
- नोव्हेंबर 2015 मध्ये एका महिलेने शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर बळजबरी प्रवेश करुन पूजा केली होती. त्यानंतर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हापासून भूमाता ब्रिगेड प्रवेशासाठी आक्रामक राहिली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे काही दिलखुलास फोटो....
बातम्या आणखी आहेत...