आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी अशी दिसत होती ही महिला, 2 वर्षात बनवली सिक्स पॅक अॅब्सवाली बॉडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षात दीपिकात झालेला बदल. - Divya Marathi
दोन वर्षात दीपिकात झालेला बदल.
पुणे- देशातील पहिली आंतरराष्ट्रीय फिगर एथलीट असणाऱ्या दीपिका चौधरीला दिल्लीत आयोजित वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये टॉप रॅंक मिळाली आहे. तिला 60 किलोग्रँम वजनगटात सुवर्णपदक मिळाले आहे. या स्पर्धेत 80 देशातून आलेल्या महिला सामील झाल्या होत्या. पुण्यात राहणाऱ्या दीपिकाने एका जीममध्ये ट्रेनिंग घेतली आहे. कधीकाळी आपल्या किरकोळ शरीरयष्टीमुळे त्रस्त असणारी दीपिका आता सिक्स पॅक अॅब्जमुळे ओळखली जाते.
 
कठिण परिश्रम करुन कमावले शरीर
- बॉडी बिल्डिंगकडे दीपिका फिटनेस कोच सेनन डे यांना भेटल्यानंतर वळाली.
- आंतरराष्ट्रीय फिगर अॅथलिट्स स्टेजवर पाहिल्यावर दीपिकाने त्यांच्यासारखे बनण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील बॉम्बसेल फिटनेस सेंटरमध्ये रोज कित्येक तासाची ट्रेनिंग आणि डायट प्रोग्राममुळे ती केवळ 2 वर्षात टॉप फिगर अॅथलिट बनली.
 
पहिली आंतरराष्ट्रीय फिगर अॅथलिट
- दीपिका चौधरी पुण्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरोलॉजीत टेक्निकल रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत आहे.
- महिला बॉडी बिल्डिंगमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दीपिकाने एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेत आयोजित आंतरराष्ट्रीय फिगर अॅथलिट स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.
- दीपिका यापूर्वी 2013 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडात आयोजित अॅथलिट कॅम्पमध्ये सहभागी झाली होती.    
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...