आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur's Anti Toll Movement Reached In Baramati

कोल्हापुरातील टोलविरोधाचे लोण पोहचले बारामतीपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - कोल्हापूरकरांनी जाचक टोल वसूल करणारे टोलनाकेच जाळून टाकले. महायुतीनेही सत्ता आल्यास राज्य टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या बारामतीतही बेकायदेशीर टोलवसुलीविरोधात वातावरण तापू लागले आहे.
या मुद्दय़ावरून विरोधकांनी संघर्षाचा पवित्रा घेतल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसलाच टोलविरोधात रस्त्यावर उतरावे लागले. बारामती नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा जयर्शी सातव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून जाचक टोल बंद करण्याची मागणी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. 2010 मध्ये टोलवसुली करार संपुनही दुरुस्तीच्या नावाखाली मुदतवाढ दिल्याचा आरोप केला आहे.
बारामतीकरांना आठ वर्षांपासून दुहेरी बेकायदेशीर टोलचा भुर्दंड पडत आहे. मात्र, कोल्हापूरकारांच्या टोलविरोधी आक्रमक पवित्र्यानंतर बारामतीतही विरोधी पक्षाचे नगरसेवक सुनील सस्ते यांनी टोलविरोधी आंदोलनाची आखणी सुरू केली. त्यातच महायुतीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्य टोलमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही बारामती टोलमुक्त करण्यासाठी आंदोलन करत शासनाला घरचा आहेर दिला.
बारामती येथील बाह्यवळण रस्त्यासाठी कायद्याला फाटा देत जाचक पद्धतीने दुहेरी टोल आकारणी केली जात आहे. 30 किमींच्या आत टोलनाके असल्याने बेकायदेशीर दुहेरी टोल बंद करण्यासाठी अनेकदा मनसे, शिवसेना, रासप यांनी यथाशक्ती आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.