आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात पुन्हा मुलींनीच मारली बाजीl; काेकण प्रथम, नाशिक शेवटच्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेण्यात अालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.२६ टक्के लागला अाहे. अाजपर्यंतच्या निकालाच्या तुलनेत ही टक्केवारी विक्रमी अाहे. सलग चाैथ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान काेकण विभागाने (९५.६८ %) पटकावला असून नाशिक विभाग (८८.१३ %) शेवटच्या स्थानावर घसरला अाहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे यंदाही उत्तीर्ण हाेणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त असून हे प्रमाण चार ते सहा टक्क्यांनी अधिक अाहे.

बारावीच्या परीक्षेस राज्यभरातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्हाेकेशनल या शाखांतील सुमारे १२ लाख ३७ हजार २४१ विद्यार्थी बसले हाेते. त्यापैकी ११ लाख २९ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले अाहेत. पुनर्परीक्षार्थी परीक्षेकरिता यंदा ९९ हजार २१९ विद्यार्थी बसले हाेते, त्यापैकी ४६ हजार २७१ म्हणजेच ४६.६४ % विद्यार्थी उत्तीर्ण झालेले अाहेत. अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के, तर रात्र महाविद्यालयाचा निकाल ६५.८२ % लागला अाहे.

धाडसी कन्या मोनिका मोरे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
मुंबई | लोकल अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेली धाडसी मोनिका मोरे हिने बारावी काॅमर्सच्या परीक्षेत मेहनत अाणि जिद्दीच्या बळावर ६३ टक्के गुण मिळवले अाहेत. ११ जानेवारी रोजी घाटकोपर स्टेशनमध्ये लोकल पकडताना मोनिकाचा अपघात झाला होता. केईएममधील सहा महिन्यांच्या उपचारांनंतर माेनिकाला कृत्रिम हात बसवण्यात अाले. या धक्क्यातून सावरत माेनिकाने घाटकोपरच्या टी. डी. मेहता महाविद्यालयात प्रवेश घेतला हाेता. माेनिकाला अाता एसएनडीटी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.

परीक्षेतील गैरप्रकारात अाैरंगाबाद अाघाडीवर
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना अाळा बसावा याकरिता ‘गैरमागार्शी लढा’ अभियान राबवण्यात अाले. त्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी सात याप्रमाणे एकूण २५२ व विशेष अतिरिक्त सहा भरारी पथके स्थापन करण्यात अाली हाेती. परीक्षा केंद्रावरील बाह्य उपद्रव राेखण्यासाठी राज्यातील ३१२ परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्यात अाले. तरीही या परीक्षेत राज्यभरात एकूण ५५४ गैरप्रकार घडले. काॅपी, ताेतयेगिरीत अाैरंगाबाद विभाग (१२४ प्रकरणे) अाघाडीवर राहिला असून लातूर (६) शेवटच्या स्थानावर अाहे.
पुढे वाचा, अपयशाच्या धास्तीने आत्महत्या केलेली मुलगी उत्तीर्ण