आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Koyana & Ujjani Dam Full, Heavy In Rain Western Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, कोयना-उजनी 100 टक्के भरले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज्यातील सर्वात मोठे धरण असलेले उजनी धरण 100 टक्के भरले आहे.)
पुणे- मागील आठ-दहा दिवसापासून पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पावसाचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसातही पुणे व परिसरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणांपैकी असलेले उजनी आणि कोयना धरण 100 टक्के भरली आहेत. तसेच या धरणातून पाणी आता कालव्यात सोडण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वीच पुणे परिसरातील भाटघर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना, मुळशी, खडकवासला आदी धरणे भरली आहेत.
मागील आठ-दहा दिवसापासून म्हणजेच गणेशाचे आगमन होण्याआधीपासून पावसाने राज्यात जोर धरला होता. मराठवाडा, मुंबई, कोकण व पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सोलापूर व मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, मागील दहा दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जायकवाडी वगळता राज्यातील बहुतेक धरणे 90 ते 100 टक्क्यांपर्यंत भरली आहे. त्यामुळे आगामी वर्षभर राज्याला दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे. जायकवाडी धरण केवळ 27 टक्के भरले आहे.