आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नेते प्रकाश चव्हाण यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माथाडी कामगार नेते प्रकाश चव्हाण यांची पाच जणांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री पुण्यात घडली. या हल्ल्यात चव्हाण यांचे दोन सहकारीही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण रात्री आपल्या चार सहका-यांसोबत पूर्णानगर येथील रॉयल हेअर क्राफ्ट या सलूनमधून बाहेर पडत होते. या वेळी अज्ञात पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. चव्हाण यांच्या सहका-यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, हल्लेखोर त्यांच्या हाती लागले नाहीत. जखमी अवस्थेत चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हेगारी वर्चस्वातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.