आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: कॉलेज प्राचार्यांकडून सहकारी प्राध्यापक महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळील दापोडी भागातील सी. के. गोयल महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पवार (वय- 58) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या सहकारी प्राध्यापक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य विकास पवार यांच्याविरोधात त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या 55 वर्षीय एका महिलेने तक्रार केली आहे. महाविद्यालयीन पातळीवर असलेल्या विशाखा समितीकडे सर्वप्रथम संबंधित महिला प्राध्यापक महिलेने तक्रार केली. मात्र, विशाखा समितीने प्राध्यापक महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अखेर प्राध्यापक महिलेने पोलिसांत धाव घेतली.
 
प्राचार्यांनी मागील महिन्याभरात आपले काही फोटोज काढले आहेत, अशी तक्रार संबंधित प्राध्यापिकेने केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...