आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Slide In Pune, Latest News In Divya Marathi

आनंदाने नांदणा-या गावाचे झाले स्‍मशान; रडायलाही कुणी उरले नाही,पाहा विदारक चित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण (ता. आंबेगाव)-उभे गाव डोंगराखाली गाडले गेल्याने माळीण गावावर शोककला पसरली आहे. पण याचे दु:ख करायलाही गावात कोणी उरलेले नाही. गावातल्या 70 घरांपैकी पाच- सहाच घरे या महासंकटापुढे कशीबशी बचावली आहेत. मात्र संकटाचे भयंकर स्वरूप पहिल्यानंतर वाचलेल्या या घरातील माणसेही घरांना कुलपे लावून आसपासच्या वाड्या-वस्त्यांवर निघून गेली आहेत. नांदत्या गावाचे स्मशान झाल्याने तेथे थांबण्याचे धाडस कोणात उरलेले नाही.

गाव गाडले जाताना पाहावे लागलेल्या सावळाराम पुनाजी लेंबे यांचे डोळे कोरडे पडले होते. हरवलेल्या नजरेने ते सांगतात, ‘सकाळी मुलीला एसटीत बसवून देण्यासाठी साडेसहाला बाहेर पडलो. मुलीला सोडून परत फिरलो आणि मोठा आवाज झाला. पाच मिनिटात डोळ्यादेखत गाव गडप झाले. कोणाला सावरायलाही सवड झाली नाही.’ गाव दिसेनासे झाल्यानंतर सावळाराम ओरडत आसपासच्या वस्त्यांवर गेले.
माळीण गाव गायब झाल्याची बातमी दुपारपर्यंत पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर परिसरातील सगेसोयरे माळीणकडे पोचले. गावाची अवस्था पाहिल्यानंतर काय झाले असावे, याचा अंदाज त्यांना लागत होता. तरीही आठवणीतल्या घराच्या जागचा चिखल उपसला जात असताना त्यांचे डोळे शोध घेत होते. कांताराम डामसे यांच्या सख्ख्या भावाचे घर गाडले गेले आहे. राडारोडा बाजूला करणा-या जेसीबी यंत्राला ते भावाच्या घराची जागा दाखवत होते.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर....