आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Landage, Bam Receive 'lifetime Achievement Awarded'

बाळासाहेब लांडगे, भीष्मराज बाम ‘जीवनगौरव’ने सन्मानित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ क्रीडा कार्यकर्ते बाळासाहेब लांडगे, भीष्मराज बाम यांना राज्य शासनाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी बालेवाडीत शिवछत्रपती पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. स्नेहा ढेपे, तेजस्विनी मुळे, सिद्धार्थ कदम, आनंद थोरात, कार्तिकी शिरोडकर, रोहिणी आवार, सुजाता शानमे, उत्तम दगडूजी इंगळे, मंगल पांडे, अशोक मगर, चंद्रजित जाधव, काका पवार, ज्ञानेश्वर गोचडे, कविता निंबाळकर, दीपा मलिक, अप्पासाहेब ढूस, दिलीप घोडके यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि राज्यमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.