आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लँडलाइन हॅक करून केले लाखोंचे आयएसडी कॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अज्ञात व्यक्तींनी पुण्यातील एका कंपनीचा चक्क टाटा लँडलाइन हॅक करून दोन दिवसांत साडेपाच लाख रुपयांचे आंतरराष्ट्रीय कॉल्स केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या सायबर विभागाकडे प्रथम लँडलाइन हॅक झाल्याची तक्रार आली आहे.
कोरेगाव पार्क येथे इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत टेक्निकल सपोर्ट व ट्रेडिंग अशा स्वरुपाचे कामकाज चालते. कंपनीत आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील होतात. कंपनीच्या कामासाठी टाटाकडून एक पीआरआय लाइन घेतली असून त्याला एक पायलट क्रमांक देण्यात आला आहे. टाटाच्या मेन कनेक्शनवरून 19 एक्सटेन्शन घेण्यात आलेले आहे. टाटा कंपनीचा हा लँडलाइन फोन हॅक करून आठ व नऊ डिसेंबर 2013 या दोन दिवसांत बोस्निया, हज्रेगोविना व हैती या देशात आंतरराष्ट्रीय कॉल्स करण्यात आले असून त्याचे बिल साडेपाच लाख रुपये इतके झाले आहे. ज्यादिवशी हे आंतरराष्ट्रीय कॉल्स करण्यात आले आहे, त्यादिवशी कंपनीला सुटी होती व कंपनीत कोणीही हजर नव्हते.
पोलिस आता माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन आंतरराष्ट्रीय कॉल्सबाबत व लँडलाइन हॅक प्रकरणी तपास करत आहेत.