आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे दरड काेसळल्याने ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा बाेगद्याजवळ साेमवारी सकाळी दहाच्या सुमारास माेठी दरड काेसळल्याने पुणे-मुंबई वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने महामार्गावर तीन ते चार किलाेमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत दरड बाजूला करण्याचे काम सुरू हाेते. त्यामुळे वाहतूकदारांचे माेठे हाल झाले.

दरड काेसळल्यानंतर डाेंगरावरील छाेटे-माेठे दगड व माती रस्त्यावर येऊन रस्ता बंद झाला. या वेळी पुण्याकडे जाणार्‍या एका कारवर दरड कोसळून पदम जैन व नरेंद्र जैन हे किरकाेळ जखमी झाले. घटनेनंतर आयआरबी कंपनीचे कर्मचारी व पाेलिस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी मदतकार्य सुरू केले. महामार्ग पाेलिसांनी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली. मात्र, खंडाळा परिसरात सुरू असलेल्या संततधर पावसामुळे अगाेदरच धिम्या गतीने सुरू असलेल्या वाहतुकीच्या काेंडीत आणखीच भर पडली.

एकवीरा मंदिराजवळ दर्शन बारी, कार्यालयाचे नुकसान
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला येथील एकवीरा मंदिराजवळ साेमवारी पहाटे दरड काेसळून एकवीरा देवी विश्वस्त मंडळाचे कार्यालय व दर्शन बारीचे नुकसान झाले आहे. लाेणावळा परिसरात अतिवृष्टी हाेत असल्याने एकवीरा देवीच्या मंदिराजवळील डाेंगरावरील छाेटे-माेठे दगड खाली काेसळून विश्वस्त कार्यालयाचे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळली, त्यावेळी भाविकांची संख्या तुरळकच असल्याने माेठा अनर्थ टळला.
बातम्या आणखी आहेत...