आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Landslide In Malin, Pune District; Latest News In Marathi

उद्‍ध्वस्त माळीणमध्ये मृतांचा आकडा 92 वर; तर दुर्घटना टाळता आली असती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेनंतर पाच दिवस उलटले असून देखील अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यात मृतांचा आकडा सारखा वाढतच आहे. मृतांचा आकडा 92 वर पोहोचला आहे. अजून शेकडो लोक ढिगार्‍याखाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. एनडीआरचे जवळपास तीनशे जवान दिवसरात्र काम करत आहेत.

मदत कार्यात व्यस्त असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने स्पेशल लाइफ डिटेक्टर मशिनांचा वापर करताना दिसत आहे. मात्र, आता ढिगार्‍याखालील व्यक्तीपैकी कोणी जिवंत असेल याबाबतची आशा जवळपास संपली आहे. आज (रविवार) दुपारपर्यंत 92 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यात 37 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे.
पाऊस थांबल्याने मदत कार्याचा वेग वाढला...
माळीण गावासह परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असल्याल्या पावसाने रविवारी उसंत घेतल्याने मदत कार्याचा वेग वाढला आहे. पावसामुळे यापूर्वी मदत कार्यात अनेक अडचणी येत होत्या. शनिवारी ढिगार्‍याखालून अनेक जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे ढिगारा उपसण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जेसीबी मशिनांचा सावधगिरीने वापर केला जात आहे.

माळीणमधील आवाजाची चौकशी होणार- गृहमंत्री
माळीण येथे दरड कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाला होता. स्‍फोट सदृश्य आवाज असल्याचे गावकर्‍यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना सांगितले. गृहमंत्री पाटील दुर्घटना ग्रस्त भागाची पाहाणी करण्‍यासाठी आले होते. स्‍फोट सदृश्य आवाजाची चौकशी करण्‍यात येईल, अश‍ी माहिती पाटील यांनी दिली.
पुढील स्लाइडसवर वाचा, ...तर माळीणमधील भीषण दुर्घटना टाळता आली असती....