आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पतीच्या उपचारासाठी धावली होती ही 67 वर्षीय माऊली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- गतवर्षी पतीच्या उपचारासाठी धावून मॅरेथॉन जिंकणाऱ्या 67 वर्षीय लताबाई करे यांनी दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांकासह हजारांचे बक्षीस मिळवले. पहिल्या वर्षी पतीसाठी धावल्यानंतर लताबाई यंदा आपल्या बेरोजगार मुलाच्या भविष्यासाठी धावत त्यांनी ज्येष्ठ नागरिक गटातून सलग दुस-या वर्षी बारामती मॅरेथॉन जिंकली.
पती आजारातून बरे : 'दिव्यमराठी'ने लताबाईंच्या चिकाटीची दखल घेतल्यानंतर त्यांचे पती भगवान करे यांच्यावर पुण्यातील धर्मादाय रुग्णालयात उपचार झाले. सध्या ते धोक्यातून पूर्णपणे बाहेर आहेत.

आता मदत नको, हाताला काम द्या: 'दिव्यमराठी'ने पुढाकार घेतला आणि लताबाईंना देशभरातून मदत मिळाली. त्यातून काही आर्थिक विवंचना दूर झाल्या. मात्र, आता पैसे नको, मुलाच्या हाताला काम द्या; हक्काचं घर द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुढे पाहा, लताबाई व बारामती मॅरेथॉन स्पर्धेचे फोटो...