आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latabai Become Lakhpati, Husband Treatment Possible

जिद्द तिची: लताबाई झाल्या लखपती, पतीच्या उपचारांची सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - पतीच्या उपचारांसाठी पैसे मिळावेत म्हणून थंडीच्या कडाक्यात मॅरेथॉनमध्ये धावणा-या 65 वर्षीय लताबाई करे यांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या बारामती शाखेत (खाते क्रमांक : 33532974361) त्यांच्या खात्यावर दानशूरांनी आतापर्यंत 1 लाख 72 हजार रुपये टाकले आहेत.
दैनिक ‘दिव्य मराठी’सह दैनिक ‘भास्कर’ च्या सर्व हिंदी आवृत्यांमध्येही हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर कानाकोप-यातूनन सधन दानशूरांनी हजारो रुपये जमा केले. हातावरचे पोट असणा-या लताबाई मदतीमुळे भारावून गेल्या आहेत.