आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Late Members Still On Vishwakosh Board, Board Unkown On Deshpande, Dhasal Death

दिवंगत सदस्य अजूनही विश्वकोश मंडळावर !, देशपांडे, ढसाळांच्या निधनाबाबत मंडळ ‘अनभिज्ञ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी विश्वकोश मंडळाने दिवंगत सदस्यांना संकेतस्थळावर अद्याप कायम ठेवले आहे. काळाच्या ओघात मंडळाचे जे सदस्य दिवंगत झाले, त्यांची नावे अजूनही संकेतस्थळावर आहेत.विश्वकोश मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंडळाचे सदस्य या विभागात ज्येष्ठ संशोधक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, डॉ. सुधा काळदाते आणि ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांची नावे अद्याप दिसत आहेत. विशेष म्हणजे मंडळाचे आणखी एक सदस्य डॉ. भा. ल. भोळे यांच्या नावापुढे मात्र कंसामध्ये दिवंगत 24 डिसेंबर 2009 अशी नोंद केली आहे. डॉ. देशपांडे, डॉ. काळदाते आणि ढसाळ यांच्या नावापुढे मात्र तशी नोंद करण्याचा विसर विश्वकोश मंडळाला पडला आहे.
मंडळाच्या सदस्यपदी विविध क्षेत्रांतील मान्यवर संशोधक, अभ्यासक-तज्ज्ञ यांची निवड विषयानुरूप केली जाते. डॉ. देशपांडे, डॉ. काळदाते आणि ढसाळ यांची अशाच पद्धतीनेनिवड करण्यात आली होती. मात्र, या सदस्यांच्या निधनानंतर बरेच दिवस उलटूनही मंडळाच्या संकेतस्थळाला अद्याप अपडेटिंगला वेळ मिळालेला नाही.
लवकरच बदल करू
मराठी विश्वकोश मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे अपडेटिंग करण्यासाठी मी स्वत:च सी-डॅक संस्थेत जाणार आहे. तेव्हाच दिवंगत सदस्यांच्या नावांबाबतचे आवश्यक ते बदल करुन घेतले जातील.
डॉ. विजया वाड, अध्यक्ष, विश्वकोश मंडळ