आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : यंदाची विसर्जन मिरवणूक लांबली, सकाळी नऊच्या दरम्यान झाले दगडूशेटचे विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मानाच्या गणपती मंडळांची पारंपरिक वाद्यपथकांच्या निनादात आणि शिस्तीत निघालेली मिरवणूक, तुरळक मंडळांचा अपवाद वगळता साऱ्यांनी गुलाल न उधळण्याची पाळलेली शपथ, ठेकेदार गाण्यांवर थिरकणारी तरुणाई आणि शहरातील प्रमुख १३ रस्त्यांवरून वाजतगाजत गणरायाला निरोप देण्याची हुरहुर..अशा वातावरणात पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता झाली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मिरवणूक अर्धा तास लवकर संपली. संपूर्ण मिरवणूक काळात शहरात ढोलताशांच्या सुरांवर रिमझिम सरींनीही सूर धरल्याने वातावरण आल्हाददायक होते. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.

नेहमीच्या प्रथेनुसार गुरुवारी सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासह मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. कसबा गणपतीपाठोपाठ ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मित्रमंडळ आणि केसरीवाडा हे मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत दाखल झाले आणि खऱ्या अर्थाने मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या पाचही गणपतींच्या पुढे नगारा, सनई, ढोल-ताशा, लेझीम, टिपरी, ध्वजपथकांची मोठी संख्या असल्याने मिरवणुकीला विलंब होत होता. प्रत्येक चौकात खेळ करण्याचा हट्ट पथकांनी धरल्याने पोलिसांचाही नाइलाज होत होता.

डॉल्बीचे साम्राज्य
लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्यानंतर रात्री बारापर्यंत डॉल्बीचे साम्राज्य होते. त्यावर युवक बेधुंदपणे रात्री उशिरापर्यंत नाचत होते. सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा स्पीकर्सच्या भिंती सुरू करून अखेरपर्यंत हेच दृश्य कायम होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे PHOTOS आणि VIDEO
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...