आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Govt May Skip Postmortem, Preserve DNA Of Victims

माळीण : रुग्णालयात पसरली दुर्गंधी, डॉक्टर म्हणाले पोस्टमार्टम नको थेट अंत्यसंस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - माळीणमध्ये सगळीकडे नातेवाईकासाठी आक्रोश करणारे आप्तेष्ट दिसत आहेत.

पुणे - माळीण गावातील दुर्घटनेमध्ये ढिगा-यातून आतापर्यंत 76 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरुच आहे. दरम्यान, माळीण जवळच्या एडिवारे येथील सरकारी रुग्णालयात मृतांचा खच जमा झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मृतदेहांचे पोस्टमॉर्टम न करता थेट अंत्यसंस्कार केले जावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृतांची ओळख पटण्यासाठी फोटो आणि डीएनए सँपल घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

यासंदर्भात आज (शनिवारी) निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी प्रक्रिया आणि इतर काही कारणांसाठी मृतदेहांची ओळख पटणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी मृतदेहांचे फोटो आणि डीएनए सँपल घेण्याबाबात विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी 80 हून अधिक लोक असण्याची शक्यता
दोन दिवस पावसामुळे मदतकार्याच चांगलीच अडचण झाली. शुक्रवारी काहीशी उघडीप मिळाल्याने मदतकार्याचा वेग वाढला. पण आता कोणी जिवंत सापडण्याची शक्यता कमीत असल्याचे बचावपथकांचे म्हणणे आहे. आजूनही 80 हून अधिक लोक ढिगा-याखाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी दोन दिवसांत ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंदिरात मृतदेह सापडण्याची शक्यता
आतापर्यंत गावातील मंदिरावरील ढिगारा उपसण्यात आलेला नाही. पावसामध्ये अनेक मुले या मंदिरात आश्रयाला जात होते. त्यामुळे या मंदिरातून अनेक मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

डबेवाल्यांचा मदतीसाठी मोहीम
मुंबईच्या डबेवाल्यांनी माळीणमधील पीडितांच्या मदतीसाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे लोक आपल्या डब्यांबरोबर एक पत्र पाठवत आहेत. त्यात लोकांना आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले जात आहे. त्यातून जमा झालेला निधी माळीणवासीयांना दिला जाणार आहे.
राज्य सरकारकडून पाच लाख
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. केंद्राच्या वतीने आधीच पीडितांसाठी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी पीडितांना घरे, धान्य आणि इतर गरजेचे सामान देण्याची घोषणा केली आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा माळीणचे काही ताजे फोटो...