आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मिस्टर अॅँड मिसेस नाटकादरम्यान अश्लिल शेरेबाजी, कलाकार संतापले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील वकिलांची संघटना बार काऊन्सिलने टिळक स्मारक मंदिरात आयोजित केलेल्या 'मिस्टर अँड मिसेस' या नाटकादरम्यान प्रेक्षकांनी अश्लिल शेरेबाजी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान, या प्रकाराने या नाटकातील कलाकार चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पुण्याला सांस्कृतिक शहर म्हटले जाते तसेच पुणेकरांनाही सुसंस्कृत मानले जाते मात्र, या प्रकाराने आपल्याला धक्का बसला असल्याचे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने म्हटले आहे. हा प्रयोग वकिलांची संघटना बार काऊन्सिलने आयोजित केल्याने संबंधित अश्लिल शेरेबाजीही वकिलांकडूनच झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला न्यायाधिश व वकिलांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अश्लिल शेरेबाजी झाल्यानेही कलाकार नाराज झाले आहेत.
याबाबत अभिनेता चिन्मय मांडलेकर याने फेसबुकवरून संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर वृत्तवाहिनीशी बोलतानाही त्याने कालच्या घटनेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सुशिक्षितपणाचा आणि सुसंस्कृतपणाचा काही संबंध नसतो हे सिद्ध झाल्याचे मांडलेकर याने म्हटले आहे.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये शरमेने मान खाली घालायला लावणारी एक घटना घडली. मिस्टर अँड मिसेस या दर्जेदार नाटकचा काल 152 वा प्रयोग टिळक स्मारक मंदिर येथे पुणे बार कौंसिल तर्फे आयोजित करण्यात आला होता. प्रयोगावेळी तेथे वकील, जज्ज व इतर मंडळी उपस्थित होती. मात्र ऐन प्रयोगावेळी काही लोकांनी अश्लील शेरेबाजीला सुरुवात केली. त्याचे प्रमाण इतके वाढले की एका पॉईंटला नाटक थांबवावे लागले. नंतर थोड्या वेळाने नाटक सुरु करण्यात आले. परंतु शेवट पर्यंत शेरेबाजी सुरूच होती. पुण्यामध्ये असा प्रकार घडणे म्हणजे कमालच झाली. काही 5-10 टवालखोरांमुळे नाटकाच्या संपूर्ण टीम व बाकीच्या सुजान प्रेक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. आपण जर एखाद्या कलाकृतीला सन्मान देऊ शकत नसाल तर निदान आपल्याकडून त्या कलाकृतीचा अपमान तरी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खरे तर चिन्मयजी मांडलेकर अणि मधुराजी वेलणकर या कलाकरांना मनापासून दाद द्यायला हवी ज्यानी झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करुन उपस्थित असलेल्या काही सुजान प्रेक्षकांकरीता "SHOW MUST GO ON" असं ठरवून पुढे संपूर्ण नाटक पार पाडले, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियातून उमटल्या आहेत.
पुढे वाचा व पाहा, चिन्मय मांडलेकरने फेसबुकवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.....