आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मण जगताप यांच्यावर दोन गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. सांगवी पोलिस चौकी व पिंपरी पोलिस चौकी येथे हे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त डॉ.राजेंद्र माने यांनी दिली आहे.

जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्तिप्रदर्शनात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वाहनांपेक्षा अधिक वाहनांचा वापर केला. मोठय़ा प्रमाणावर दुचाकी, बस व आलिशान मोटार यांच्यासह त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सांगवी, दापोडी, पिंपरी, काळेवाडी परिसरात रॅली काढली.

याप्रकरणी सांगवी पोलिस चौकीत संयोजक व उमेदवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणूक अर्ज भरताना केवळ चार व्यक्ती निवडणूक कार्यालयात आणणे अपेक्षित असताना त्यांनी र्मयादेपेक्षा अधिक लोक कार्यालयात आणले.याप्रकरणीही जगताप यांच्यावर पिंपरी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.