आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxmibai Tilak Felicitated In Pimpri Chinchwad Sahitya Sammelan

सभामंडपाला नाव देत साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांचा गाैरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानाेबा-तुकाेबा नगरी - नाशिकचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे, स्त्रीमनाचे भूषण असलेल्या साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांचे नाव साहित्यनगरीतील एका सभागृहाला देऊन लक्ष्मीबाईंना त्यांच्या शतकाेत्तर सुवर्णजयंती वर्षात वंदन करण्याचा प्रयत्न अायाेजकांनी केला अाहे. साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांचे सध्या शतकाेत्तर सुवर्णजयंती वर्ष सुरू अाहे.
१ जून १८६६ राेजी लक्ष्मीबाईंचा जन्म झाला. ‘स्मृतिचित्रे’च्या रूपाने मराठीतील पहिले अात्मचरित्र वाचकांच्या हातात अाले. त्यातून लक्ष्मीबाईंचे अाणि त्या काळातील स्त्रीचे जगणे प्रातिनिधिक स्वरूपात एका अर्थाने प्रतीत झाले हाेेते. नाशिकसह शहरात लक्ष्मीबाईंच्या शतकाेत्तर सुवर्णजयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम हाेत अाहेत. याच निमित्त लक्ष्मीबाईंच्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या पणती मुक्ता अशाेेक टिळक यांनी संमेलन अायाेजकांशी संपर्क साधून लक्ष्मीबाईंच्या शतकाेत्तर सुवर्णजयंती वर्षाची अाठवण करुन दिली. त्याची तत्काळ दखल घेत अायाेजिकांनी येथील एका सभामंडपाला साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक यांचे नावही दिले.

दखल घेतल्याने अानंद : मुक्ता टिळक
संमेलनाच्या अगदीच ४-८ दिवस अाधी माझा महामंडळाच्या अध्यक्षा डाॅ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क झाला हाेता. त्या वेळी मी त्यांना पणजीबाईंच्या (लक्ष्मीबाई) शतकाेत्तर सुवर्णजयंती वर्षाची अाठवण करून दिली. अापण तत्काळ यावर विचार करू असे त्यांनी सांगितले व एका सभामंडपाला पणजीबाईंचे नाव दिले याचा अानंद वाटताे, अशा भावना मुक्ता टिळक यांनी व्यक्त केल्या.