आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एलबीटीविरोधात रॅली; 15 व्यापार्‍यांवर गुन्हे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करत बेकायदा रॅली काढल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलिसांनी मंगळवारी व्यापारी असोसिएशनच्या 15 पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सूर्यकांत पाठक, फत्तेचंद रांका, मुरलीभाई शहा, महेंद्र पितळिया, जयंत ओस्तवाल, मुरलीभाई किराड, दिनेश परमार, संजय पाटील, संजय ओस्तवाल, राऊत पांडोल, अजित राठोड, अजित शेट्टीया व वसंत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहराच्या हद्दीत 5 ते 18 मे दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करत व्यापारी असोसिएशनने बाजीराव रस्त्यावरील महाराणा उद्यान ते डेक्कन भिडे पुल या दरम्यान रॅली काढल्याची पोलिसांची तक्रार आहे.

दरम्यान, काही व्यापार्‍यांनी रॅलीत आपल्यासोबत ‘बाऊन्सर’ही आणले होते. त्यांच्यात व पोलिसांमध्येही बाचाबाची झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पिंपरी-चिंचवड परिसरात रॅली काढणार्‍या व्यापार्‍यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.