आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील तिसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जुन्‍नर तालुक्‍यात नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बोटा गावाच्या परिसरात काल गुरुवारी मध्यरात्रीच्‍या सुमारास ही घटना घडली. पुणे-नाशिक महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात एखाद्या भरधाव वाहनाची जोरदार धडक लागल्‍याने बिबट्या जागीच ठार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिका-यांनी वर्तविला आहे.

 

महामार्गाने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना सकाळी हा मृतदेह दिसला. त्यांनी ताबडतोब महामार्ग नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला आहे. 

 

गेल्या काही दिवसात जुन्नर तालुक्यात धडक लागल्याने बिबट्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. अन्न आणि पाण्याच्‍या शोधात रात्रीच्या वेळेस हे प्राणी रस्त्यावर येतात आणि रहदारीच्‍या महामार्गावर वाहनाची धडक बसल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू होत आहे.  मावळ आणि जुन्नर परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून आला आहे. रात्री बिबट्या बाहेर निघण्याचे प्रमाण वाढत असून अपघातामध्‍ये त्‍यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...