आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, पुणे जिल्ह्यातील चौथी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिक्रापुर-चाकण महामार्गावरील चौफूला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. रात्री भक्ष्याच्या  शोधासाठी बाहेर पडलेल्या  बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. बिबट्याचा वावर लोकवस्तीकडून आता महामार्गावर होत असल्याने बिबट्याच्या अपघाताच्या घटनांत वाढ होत चालली आहे.

 

दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्याचा अपघात मृत्यु  झाला होता आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचा मृत्यू  झाल्याची हो चौथी घटना घडली आहे.

 

मावळ आणि जुन्नर, शिरूर या  परिसरात  बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून आला आहे. रात्री बिबट्या बाहेर निघण्याची प्रमाण वाढत असून महामार्गावर येत असल्याने वाहनांची धडक बसते. आणि अपघातात दुर्दैवाने मृत्यू होतो.

 

वाहनाच्या धडकेत मादीचा मृत्यू...

काल (रविवार) देखील अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पुणे नाशिक महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना एखाद्या भरधाव वाहनाची जोरदार धडक लागून बिबट्या जागीच  ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱयांनी वर्तविला आहे. महामार्गाने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना सकाळी उजाडल्यावर बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यांनी महामार्ग नियंत्रण कक्षाला त्याबाबत माहिती दिली. मात्र वनाअधिकारी  वेळेवर न पोहचल्याने आणि त्वरित उपचार न मिळाल्याने बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... मृत बिबट्याचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...