आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या संरक्षणासाठी तृप्ती देसाईंची 'ताईगिरी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - छेडछाड, शेरेबाजीविरोधात महिलांना सक्षम करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नवरात्रात ताईगिरी पथक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ताईगिरी पथक राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. या पथकातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एक पथक सहा जणांचे असेल. सोबत दोन पुरुष सहकारीही असतील. उत्सवाच्या काळात महिलांना त्रास देणाऱ्या, छेड काढणाऱ्या, फसवणाऱ्या टोळक्यांवर तसेच रोडरोमिओंवर पथक लक्ष ठेवेल, त्रास देणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे कामही करेल. या पथकातील महिलांचे संपर्क क्रमांक जाहीर केले जातील, त्यामुळे संकटात सापडलेल्या महिलांना त्याचा उपयोग होईल, असेही देसाई म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...