आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - काँग्रेसला बहुमत मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करावी लागते, अशी अगतिकता बोलून दाखवतानाच काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आणा, राष्ट्रवादीची गरजच पडणार नाही, असा इशारेवजा सल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला.
नेत्यांशी बुधवारी संवाद साधल्यानंतर राहुल बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीएचे संख्याबळ वाढेल आणि आघाडीच पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा राहुल यांनी केला. आपसातील मतभेद, गटबाजी विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि मंत्र्यांनी पक्षाला वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेखही राहुल यांनी केला नाही. बैठकीत माध्यमांना प्रवेश नव्हता. काही काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्या भाषणाचा तपशील सांगितला.
पंतप्रधानपदाचे उमेदवार : लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी राहुल यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून शुभेच्छा दिल्या. पत्रकारांनीही छेडले तेव्हा राहुल यांनी योग्य वेळी उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
कलमाडींबद्दलची संदिग्धता : निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांना पुन्हा पक्षात घ्यावे अशी मागणी उपमहापौर व कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पुणे फेस्टिव्हलला हजेरी लावतात, याचा अर्थ कलमाडींना काँग्रेसची उमेदवारी मिळणार असा लावायचा का, या प्रश्नावर राहुल यांनी स्पष्ट होकार किंवा नकार देणे टाळले.
राष्ट्रवादीला टोला
राष्ट्रवादीकडून होणा-या दादागिरीवर राहुल यांच्याकडे कार्यकर्त्यांनी नाराजी नोंदवली. त्यावर राहुल यांनी ‘तुम्हे यहां तकलीफ देनेवाले दिल्ली में हमारा कुर्ता पकडके पीछे आते हैं,’ अशी मार्मिक टिप्पणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.