आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुन्‍नाभाई\'ची जेलमधील लाइफ अशी, कमावतो 25 Rs, बनवला सिक्‍स पॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तची 27 फेब्रुवारीला सुटका होणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे संजय दत्‍त याची कारागृहातील लाइफ कशी आहे याची खास माहिती...
संजय दत्तचा कारागृहातील प्रवास
- 16 मे 2013 रोजी मुंबईतील न्‍यायालयात आत्मसमर्पण केल्‍यानंतर तो सहा दिवस आर्थर रोड जेलमध्‍ये होता.
- 22 मे रोजी त्‍याला पुण्‍यातील येरवडा जेलमध्‍ये शिफ्ट करण्‍यात आले.
- ऑक्‍टोबर 2013 मध्‍ये मेडिकल ग्राउंडवर 28 दिवसांसाठी तो बाहेर आला.
- नंतर डिसेंबर 2013 मध्‍ये पत्‍नी मान्‍यता आजारी असल्‍याने पुन्‍हा तो 28 दिवसांच्‍या सुटीवर बाहेर आला.
- जानेवारी 2014 मध्‍ये पत्नीच्‍या आजारपणानेमुळे त्‍याला पुन्‍हा 28 दिवसांची सुटी मिळाली.
- ऑक्‍टोबर 2014 मध्‍ये 14 दिवसांच्‍या सुटीवर तो बाहेर आला.
- मुलगी इक्राची तब्‍येत बिघडल्‍याने ऑगस्‍ट 2015 मध्‍ये त्‍याला 30 दिवसांची सुटी मिळाली होती.
असे आहे जेलमधील आयुष्‍य?
- येरवडा जेलमध्‍ये आल्‍यानंतर त्‍याच्‍यासाठी घरून येणारे जेवण बंद करण्‍यात आले. त्‍याला कारागृहातील इतर कैद्यांसोबतच जेवण करावे लागते.
- संजय हा अभ्‍यासात कमकुवत असल्‍याने त्‍याला कागदापासून लिफाफे बनवण्‍याचे काम दिले गेले.
- एरवी दिवसाकाठी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या संजय दत्‍तला कारागृहात मात्र केवळ 25 रुपये रोज मिळत होता.
- कारागृहातील कैद्यांना अभिनय शिकवणे आणि कारागृहातील कार्यक्रमांचे संचालनाचे काम तो करत होता.
- या तीन वर्षात त्‍याचे 18 किलो वजन कमी झाले.
- वजन कमी केल्‍यासोबत संजय दत्तने सिक्स मॅक अॅब्सही बनवले.
पुढील स्‍लाइडवर जाणून संजय दत्‍त याची कारागृहातील लाइफ कशी आहे ते आणि पाहा कारागृहातील फोटोज...