पुणे- एका बारमध्ये ड्रिंक करताना एका व्यक्तीला थेट रूग्णालयातच दाखल करावे लागल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटात 6 इंचाचे बीळ तयार झाले असल्याची माहिती दिली आहे.
नेमके काय घडले
- या व्यक्तीने बारमध्ये नायट्रोजन असलेले ड्रिंक मागितले. या ड्रिंकमधुन धुर येत होता.
- त्याने या ड्रिंकचा पेग घेताच त्याला पोट दुखत असल्याचा त्रास होऊ लागला. त्याने हे ड्रिंक खराब वाटल्याने आणखी एक ड्रिंक मागवले.
- हे ड्रिंक घेतल्यावर तर त्याचा त्रास आणखीनच वाढला. त्याची तब्येत इतकी खराब झाली की त्याला रुग्णालयातच दाखल करावे लागले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत त्याचे प्राण वाचवले आहेत.
ड्रिंक केल्यानंतर पोटात झाले 6 इंचाचे बीळ
- डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या पोटात 6 इंचाचे बीळ झाले आहे.
- डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया केली नसती तर या व्यक्तीचे प्राण गेले असते.
- शस्त्रक्रियेनंतर हे स्पष्ट झाले आहे की या ड्रिंकमध्ये लिक्विड नायट्रोजन होते. त्यामुळे पोटात बीळ तयार झाले होते.