आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीचे माेदींना पत्र, पीएमओकडून मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाली यादव - Divya Marathi
वैशाली यादव
पुणे - वैशाली यादव. सात वर्षांची चिमुकली. हृदयरोगामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया गरजेची होती. परंतु, गरिबीमुळे हे उपचार करणे कुटुंबाला अशक्य होते. शेवटी वैशालीने थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात हिंदी भाषेत पत्र पाठवले. व्यथा मांडली आणि तितक्याच तातडीने तिला मदतही मिळाली. शस्त्रक्रियेनंतर आता तिची प्रकृती सुधारत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या वैशालीच्या हृदयाला छिद्र होते. गवंडी काम करणाऱ्या तिच्या वडिलांना यावर उपचाराचा खर्च झेपणारा नव्हता. प्रारंभी औषधांसाठी त्यांनी घरातील खेळण्या आणि आपली सायकलही विकली होती.

शेवटी दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या वैशालीने एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहिले. कुटुंबाची आर्थिक स्थिती स्पष्ट करून मदतीची याचना केली. वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या एका आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने याबाबत पुणे जिल्हा कार्यालयास कळवले. अधिकाऱ्यांनी वैशालीचा शोध घेऊन रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. २ जूनला तिच्यावर मोफत शस्त्रक्रियाही झाली. वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले, ‘या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख खर्च येणार होता. आम्हाला एवढा खर्च पेलवणारा नव्हताच.’

पुढे वाचा..
> उत्तर येण्याची अपेक्षा नव्हती!
> २४ मे रोजीच निरोप आला
बातम्या आणखी आहेत...