आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या जाेडप्याच्या पुण्यात घरफाेड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येरवडा भागातील यशवंतनगर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या एका जाेडप्याने पुणे शहराच्या विविध भागात अनेक घरफाेड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी आकाश हेमराज परदेशी (वय-२४) व उषा राम कांबळे (२३) या आराेपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन घरफाेडीतील सव्वाचार लाख रुपये किंमतीचे १८ ताेळे साेन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

आळंदी रस्ता, निगडी प्रधिकरण, येरवडा या भागांत कुलूप बंद असलेले घरे व कार्यालये हेरून हे दाेन्ही आराेपी दिवसा व रात्रीच्या वेळी घरफाेड्या करत असत. त्यांनी विश्रांतवाडी, निगडी, येरवडा पाेलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सदर दाेघे अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी आकाश याच्यावर घरफाेडीचे २७ तर उषा हिच्यावर ११ घरफाेडीचे गुन्हे दाखल आहेत. पाेलिस उपआयुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक पाेलीस आयुक्त राजेंद्र जाेशी यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, सहाय्यक पाेलीस निरीक्षक सुनिल गवळी यांचे पथकाने सदर कारवार्इ केली. सदर आराेपींची माहिती पाेलीस नार्इक यशवंत खंदारे यांना मिळालेली हाेती
बातम्या आणखी आहेत...