आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल मास्तरांचा पुण्यात क्लास, कार्यकर्त्यांचा वाढविणार उत्साह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज (बुधवार) दुसरा दिवस आहे. काल रात्रीच्या सुमारास राहुल गांधी नागपूर येथून विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आज ते संबोधित करणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी पुण्यात राजभवनात थांबले आहेत. नॅशनल सिक्युरिटी गार्डसने केलेल्या विनंतीवरून राज्यपालांनी त्यांना राजभवनात थांबण्याची परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा ते पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी मावळ गोळीबार प्रकरणानंतर ते पुण्याच्या दौऱ्यावर आले होते.

विदर्भाचा दौरा आटोपून काल रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी राहुल गांधी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आले होते. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते राजभवनात गेले.

आज सकाळी 9.45 वाजता, राजभवनात रात्री आराम केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज सकाळी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेतेमंडळी उपस्थित होते.

आज सकाळी 10.30 वाजता, राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांच्या भेटीला येत आहेत.

पुढील वृत्त थोड्याच वेळात....

राहुल गांधी यांनी बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला... बघा छायाचित्रे पुढील स्लाईडवर...