आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित ऑटोमोटिव्ह: कामगार \'इन\' कंपनी \'आऊट\', कामगारांचा कंपनीतच मुक्काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी प्रशासनाने अचानकपणे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला. काल (मंगळवार) रात्री सुमारास कंपनी प्रशासनाने गेटवर लॉक आऊटची नोटीस लावली. नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर कंपनी बंद असल्याची माहिती समजली, असे बेरोजगार झालेल्या कामगारांनी म्हटले आहे.

 

गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचे वेतन देखील दिलेले नाही. याशिवाय अनेक कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीतील जमा रक्कमसुद्धा कंपनीने अदा केलेली नाही. या कंपनीत जवळपास 300 कामगार वेगवेगळ्या पदावर काम करत होते. अचानक कंपनी बंद झाल्याने कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. यापूर्वी वेतन थकीत प्रकरणी कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देत कंपनी प्रशासनाला सुनावले होते. कामगारांना वेळेत वेतन द्यावे, असे आदेश देखील यावेळी देण्यात आले होते. आता कंपनी बंद करण्याचा निर्णय घेऊन कंपनीने कामगारांना धक्का दिला आहे. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या पिंपरी, भोसरी, नेरे, सांगली, सातारा याठिकाणी असणाऱ्या शाखादेखील बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अविनाश कलाटे या कामगाराने दिली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.... पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कामगारांच्या आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...