आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Maharashtra, Pune, Ajit Pawar, Divya Marathi

महाराष्‍ट्रातील दुस-या टप्प्यातील मतदानास प्रारंभ; पवार, शिंदे यांनी केले मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्‍ट्रातील दुस-या टप्प्यातील लोकसभा मतदानास सुरूवात झाली आहे. एकूण 19 लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे.राज्यातील दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूरमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटूंबासह मतदान केले. मोदींची सोलापूरात लाट नव्हे, तर शिंदे लाट आहे, असे त्यांनी मतदानानंतर माध्‍यमांना सांगितले. दुसरीकडे बारामतीत राष्‍ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुप्रिया मोठ्या फरकाने जिंकून येईल, असे अजित पवार यांनी वार्ताहरांना सांगितले.


मी कधी पर्सनल अटॅक करत नाही, तर मी पॉलिसीवर बोलते, असे सुप्रिय सुळे यांनी मतदानानंतर माध्‍यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस यांची कामगिरी इतरांपेक्षा नक्कीच चांगली राहिल.