आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\'च्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा; 2 व्हीआयपी टॉयलेट जमीनदोस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस'च्या सेटवर लोणावळा नगर परिषदेने अखेर हातोडा चालविला आहे. अनधिकृत बांधकांमांवर नगरपरिषदेने जेसीबी फिरवत 2 व्हीआयपी टॉयलेट जमीनदोस्त केल्या आहे.

 

लोणावळा नगरपरिषदेने 27 नोव्हेंबरला 'बिग बॉस'ला या संदर्भात नोटीस बजावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

चित्रीकरणाचा परवाना रद्द करा...
पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत लोणावळ्यात अवैध बांधकाम तसेच सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा ठपका बिग बॉसवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे बिगबॉस शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारसही करण्‍यात आली आहे.

 

नोटिस प्राप्त झालेपासून 32 दिवसांच्या आत सदरचे विनापरवाना व अनधिकृत पक्के व कच्च्या स्वरुपाचे बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही देण्यात आले होते.

 

दरम्यन, तीन वर्षे होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसेच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. याशिवाय अग्निशमन यंत्रणा तसेच कर्मचारी नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... लोणावळा नगर परिषदेने बिग बॉसच्या घरावर केलेल्या कारवाईचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...