आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांचा लाँग विकेंड, त्यात भुशी डॅम ओव्हर फ्लो; तरुण-तरुणींनी अशी लुटली मजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा - पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाले आहे. 2 दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने डॅमची पातळी ही वाढली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळामध्ये येत आहेत.विशेष म्हणजे याठिकाणी धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. 
 
पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळ्यातील भूशी डॅम कधी ओव्हर फ्लो होईल याची वाट पाहत असतात. यावर्षी ईदच्या अगोदर जोरदार पाऊस झाल्याने भूशी डॅम ओव्हर फ्लो झाले आहे, तसेच मुंबई पुणे हा धृतगती मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.या पावसाने पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळालीे. धरणाच्या सांडव्यावरुन पायर्‍यांवर पाणी वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी 40 टक्के असलेले धरण आज (सोमवारी) सकाळी ओव्हर फ्लो झाले आहे.
 
शनिवार, रविवार आणि  ईदची अशा सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भूशी डॅम येथे दाखल झाले आहेत. या ठिकाणी प्रत्येकजण खूप धमाल करत आहेत. धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात भिंजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. त्याच बरोबर भुशी डॅम वर स्वतः ची काळजी घेण्याच आव्हान देखील प्रशासनानं केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...