आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा; निर्मात्यांना नोटीस, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'चे निर्माते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. लोणावळा नगर परिषदेने त्यांना नोटिस बजावली आहे. बिगबॉस शोच्या चित्रीकरणाचा परवाना रद्द करा, अशी शिफारसही करण्‍यात आली आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत लोणावळ्यात अवैध बांधकाम तसेच सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा ठपका बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.

 

इंडेमॉल इंडिया प्रा.लि.द्वारा श्री.सर्वेशसिंग सुपरव्हिझिंग प्रोड्युसरने (501 समर्थ वैभव ओशिवरा अंधेरी, मुंबई) इंडिया व एबीसी बेअरिंग कंपनी वार्ड जी लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे या मिळकतीमध्ये विनापरवाना आणि अनधिकृत बांधकाम जागेवर केल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

नोटिस प्राप्त झालेपासून  32 दिवसांच्या आत सदरचे विनापरवाना व अनधिकृत पक्के व कच्च्या स्वरुपाचे बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

तीन वर्षे होऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. तसेच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उभारलेला नाही. याशिवाय अग्निशमन यंत्रणा तसेच कर्मचारी नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... बिग बॉसच्या निर्मात्यांना लोणावळा नगर परिषदेने बजावलेली नोटिस...

बातम्या आणखी आहेत...