आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळा-पुणे लोकल मधून पाय घसरला; 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड (पुणे) - देहूरोड येथे धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तपोद्र बहादूर शाही असे रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. याच रेल्वेने त्याचे कुटुंबीय सुद्धा प्रवास करत होते.

लोणावळयाहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या (लोकलने) रेल्वेमधून हा अपघात झाला. धावत्या रेल्वे दरम्यान तपोद्रचा तोल गेल्याने तो खाली पडला. यात गंभीर जखमी झालेल्या तपोद्रचा रुगणालयात घेऊन जाण्यापूर्वी घटनास्थळीच मृत्यू झाला. तपोद्र बहादूर शाही वय 28 असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे तपोद्रचे कुटुंब ही सोबत होते. तरीही हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणाचा मृतदेह शवविछेदनासाठी शासकीय रुगणालयात पाठवण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...