आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी, पाणी कमी होण्याची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा - गेल्या 48 तासांपासून लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढल्यामुळे भुशी धरणाच्या परिसरातील पाण्यात वाढ झाली आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसायला बंदी घातली आहे. पाणी कमी होईपर्यंत ही बंदी राहाणार असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
गेल्या 48 तासात 300 मिलिलिटर चा आकडा पावसाने पार केला आहे. पाऊसाचा जोर वाढल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर गर्दी करत असतात. त्यातच लोणावळा-खंडाळ्यामध्ये शनिवार-रविवार पर्यटक गर्दी करत असल्या कारणाने भुशी डॅम वरील गर्दी वाढत असते . लोणावळा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संतधार पाऊस पडत आहे. परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे. अशा वेळी पर्यटकांना पर्यटनस्थळांवर सोडणे धोकादायक आहे. याची दखल घेऊन लोणावळा पोलिसांनी भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. त्यामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसण्याचा आनंद घेता येणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले. याआधी देखील मागील वर्षी आगस्टमध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पायऱयांवर बंदी घालण्यात आली होती. यावर्षी देखील भुशी धरणावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पर्यटकांना काही काळ भुशी डॅम वरील आनंदापसून मुकावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...