आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलमट्टी धरणावर सर्वात लांब धातूचा फलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर वसलेले अलमट्टी धरण हे सिंचन प्रकल्प, वीज प्रकल्प व पर्यटकांचे केंद्र म्हणून सुपरिचित अाहे. या धरणावर ‘लालबहादूर शास्त्री सागर’ अशा नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले अाहे.
धातूची ही संपूर्ण ११ अक्षरे ११२.७ मीटर लांब बनवण्यात अाली आहेत. विशेष म्हणजे ही अक्षरे लाेणावळा येथील ऋषिकेश राऊत या डिझाइनरने बनवलेली अाहेत.
या घटनेची जागतिक विक्रमात नाेंद व्हावी याकरिता राऊत यांच्या बकेट डिझाइन कंपनीच्या वतीने, गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड अाणि लिम्का बुक अाॅफ रेकाॅर्डकडे प्रस्ताव पाठविण्यात अाला अाहे. कॅलिफाेर्नियातील प्रसिध्द अशा ‘हाॅलीवूड’अक्षरांच्या लांबी (११० मी)पेक्षा
अलमट्टी धरणावरील अक्षरांची लांबी (११२.७ मी)जास्त अाहे. हाॅलीवूडची अक्षरे १४ मीटर उंच तर ११० मीटर लांब असून त्याला बनवण्यास एक काेटी ८७ लाख रुपये खर्च अाला हाेता. तर अलमट्टी धरणावर बसवण्यात अालेली अक्षरे ही पाच ते अाठ मीटर उंच व ११२.७ मीटर लांब
असून ती बनविण्यासाठी ५० लाख रुपये खर्च अाला अाहे. धरणावरील ही अक्षरे अॅल्युमिनियम व लाेखंडापासून तयार करण्यात आली असून ऊन व पावासत ती खराब न हाेता अधिक काळापर्यंत टिकून राहतील याची खबरदारी घेण्यात अाली अाहे. स्टील व अॅल्युमिनियमच्या
फ्रेमच्या सहाय्याने ही अक्षरे धरणावर पक्की करण्यात अाली अाहेत. बकेट डिझाइनरच्या २५ कामगारांनी चार महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला असून, चार किमी दूरवरून नागरिक ही नावे व्यवस्थित पाहू शकतात.

डिझाइन मेड इन इंडियाचे उदाहरण
बकेट डिझाइन कंपनीचे संचालक ऋषिकेश राऊत ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले, जगातील इतर डिझायनरपेक्षा भारतातील डिझायनर मागे नाहीत. काेणतीही गाेष्ट करणे अाम्हाला शक्य अाहे हे यातून सिद्ध झाले अाहे. ही नावांची अक्षरे बनवण्यापूर्वी त्याची प्रतिकृती अशी फ्लेक्सची नावे अलमट्टी धरणावर लावून अक्षरांच्या उंचीचा व जाडीचा अंदाज घेण्यात अाला हाेता. अामच्या माहितीनुसार जगातील सर्वात लांब हा थ्री-डी फलक असून त्याची डिझाइन मेड इन इंडियाचे उत्तम उदाहरण अाहे.