आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loot At Hawada pune Azad Hind Express Near Pune, 2 Women Injured

पुण्याजवळ हावडा-पुणे एक्सप्रेसवर दरोडा, दोन महिलांवर शस्त्राने हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळील दौंड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज पहाटे हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसवर चार-पाच जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला. या घटनेत दोन महिला प्रवाशांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. या दोघी महिला मायलेकी आहेत. दरम्यान, त्यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला की लूट, दरोड्याचा प्रकार होता याची पोलिस चौकशी करीत आहेत. कारण इतर प्रवाशांना कोणतेही मारहाण करण्यात आली नसल्याचे समजते. या दोघी बिहारच्या असल्याचे समजते.
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस आज पहाटे पाचच्या सुमारास दौंड स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर तेथे काही वेळ थांबून ही गाडी पुण्याकडे धावू लागली. त्याचवेळी अंदाजे 4-5 दरोडेखोरांनी रेल्वेची चेन ओढली. गाडी स्लो होताच या टोळक्याने खाली उतरून या मायलेकीजवळील सामान पळविण्याचे उद्देशाने हल्ला केला. मात्र, या दोघींनी विरोध करताच त्यांच्या हातावर, दंडावर व मनगटावर चाकूने वार करण्यात आले व त्यांच्याजवळील बॅंग पळवून नेली.
धारदार चाकूने वार केल्याने डब्ब्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अचानक घडलेल्या या घटनेने या मायलेकी प्रचंड घाबरल्या. त्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला दौंडमधील रूग्णालयात दाखल केले. दोघींवर तेथे उपचार सुरु आहेत. त्यामुळे चोरट्यांनी पळवून नेलेल्या बॅंगमध्ये काय होते व किती रूपयांचा ऐवज चोरीस गेला याची माहिती मिळू शकली नाही.