आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loot Of 38 Lac Ruppees From Women At Pune, Nigerian Gang Arrested For Online Fraud

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 38 लाखांची फसवणूक करणारी नायजेरियन टोळी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सोशल मीडिया, विवाहविषयक संकेतस्थळ किंवा फेसबुकच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणा-या तीन नायजेरियन भामट्यांना पुणे पोलिसांनी दिल्लीतून सोमवारी अटक केली. ओगेरी इमॅन्युअल चिनोसो (28), टोप आलुवोलाय (31) ओसरीमेनसे स्मार्ट (30, सर्व रा. नायजेरिया) अशी आरोपींची नावे आहेत. या वेळी त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्या बँक खात्यातील साडेसहा लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. दरम्यान, या तिघांना कोर्टात हजर केले असता त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथे राहणा-या एका उच्चशिक्षीत महिलेला इंग्लंडमध्ये राहणा-या एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून 38 लाख रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले होते. याबाबत एका 38 वर्षीय महिलेने चतुश्रृं:गी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या महिलेने विवाहविषयक संकेतस्थळावर स्वत:ची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर डॉ. राजेशकुमार नामक व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवत 38 लाख रुपयांची फसवणूक केली होती. अशा प्रकारच्या 25 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. यामागे नायजेरियन टोळी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या घटना घडताना नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.