आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील मानाच्या 5 गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना, उत्सवात वरुणराजाही झाला सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- पुण्यातील पर्वती येथील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा एका युवतीने केली)
पुणे- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह आज सर्वत्र घरोघरी मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मानाच्या गणपती मंडळांकडून मंगलमूर्तींची मोठ्या दिमाखात शोभा यात्रा (मिरवणूक) काढत प्राणप्रतिष्ठापना केली. प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या मुहूर्तांवर करण्यात आली. दरम्यान, गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाल्यानंतर वरूणराजाने हजेरी लावत बाप्पांचे जोरदार स्वागत केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली. विष्णूमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आहे. त्यापूर्वी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मंदिरापासून अप्पा बळवंत चौक, एबीसी चौक, शनिपार, मंडईमार्गे मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील आणखी एक मोठे मंडळ असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना साडेबारा वाजता प्रसिद्ध वकील हर्षद निंबाळकर यांच्या हस्ते झाली. तर, जिलब्या मारूती मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापणा अरविंद खाडिलकर यांच्या हस्ते झाली.
- पुण्याचा मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 16 मिनिटांच्या मुहूर्तांवर करण्यात आली.
- मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा आज दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.
- मानाचा तिसरा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी साडेआकरा वाजता उद्योजक मनोज व प्रीती छाजेड यांच्या हस्ते पार पडली. त्याआधी या मंडळाने गणपती चौक, एबीसी, बुधवार चौक, बेलबाग चौक अशी शोभा यात्रा काढली.
- मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजता कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते झाली. त्यापूर्वी मंडळाने लोकमान्य टिळक पुतळा, शनिपार, गणपती चौक या मार्गावरून शोभा यात्रा काढली.
- मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशाची सकाळी साडेदहा वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पुढील स्लाइडवर पाहा छायाचित्रे...